रविवार, १२ डिसेंबर, २०२१

संघर्ष.....

 वयाच्या बाविसी तेविसीचा काळ मला सर्वाधिक संघर्षाचा वाटतो.नुकतंच शिक्षण संपलेलं असतं.नोकरी ,व्यवसाय याच्या शोधात माणूस भटकत असतो.भविष्याबद्दल अनेक संकल्पना, विचार दररोज डोक्यात येत असतात.पण त्याचबरोबर परिस्थितीची जाणीव असते त्यामुळे अनेकदा त्या विचारांबरोबर compromise करावे लागते.बापाने आपल्यासाठी आयुष्यभर खाललेल्या खस्तांची जाणीव असते.याच वयात आपल्या कुटुंबाचं आर्थिक बजेट,बापाच्या डोक्यावर असलेलं कर्ज यांची जाणीव होते,हीच जाणीव आपल्याला भानावर आणते आणि येथूनच सुरू होतो आयुष्याचा खरा संघर्ष.

                   या संघर्षात माणूस तहान भूक आणि जगणं विसरून उतरतो. अनेक वेळा खचतो,अडखळतो पण थांबु शकत नसतो.कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक गणितं सांभाळताना दमछाट होते.रंगेबिरंगी वाटणाऱ्या आयुष्यातून एक एक रंग उडायला लागतो..…..........

                      पण आईबापाकडून मिळालेला संघर्षचा वारसा आणि भविष्यात दिसणारं सुख त्याला प्रेरणा देत राहतं. याच प्रेरणेतून एक दिवस तो यशस्वी होतो तेव्हा त्याच्या संघर्षात कुठेही नसलेलं जग त्याच्या यशाचं कौतुक करायला सर्वात पुढं असतं.

                   -किशोर मोटकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा