सण रक्षबांधनाचा,
बहीण भावाच्या प्रेमाचा......
लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण,
माझं नाही ऐकलं तर आईला नाव सांगण;
प्रेमासोबतच बहिणीचा एक धाक होता,
भावासाठी कधी तिचा तर कधी तिच्यासाठी भावाचा त्याग होता.
भावा - बहिणींची सुखदुःखात सोबत असते,
कधी बहिणीसाठी भाऊ तर कधी भावासाठी बहीण राबत असते.
बरोबर असल्यावर कौतुक तर चुकल्यावर कान पकडण्यात बहीण मागे नसते,
कारण आई बापानंतर तिच्या एवढी जवळची व्यक्ती दुसरी कोणी नसते;
भावासाठी बहिणीच्या चेहऱ्यावर कधी हसू, तर कधी डोळ्यात पाणी असतं,
प्रत्येक बहिणीचं भावाकडे आई बापाच्या काळजीपोटी एक गाऱ्हाणं असतं!
बहीण भावाचं नात म्हणजे क्षणात मस्ती,क्षणात कट्टी,
तरीही प्रत्येकाला हवी असते एक बहिण हट्टी!!!
-शब्दांकन: किशोर मोटकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा